शिर्डी (प्रतिनिधी) साई भक्तीची ओढ महिलेला समाधानासाठी कारण ठरली असलीतरी मात्र धुमस्टाईल चोराच्या पथ्यावरच ठरत असल्याने शिर्डी पोलीस धुमस्टाईल चोरांना कधी गजाआड करणार असा सवाल आता विचारला जात असून या बाबत कठोर भूमिका लगतच्या काळात घेण्याबाबत विचारमंथन सुरू असून लवकरच एक शिष्टमंडळ या बाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घालणार आहे
आधिक माहिती अशी की शिर्डी येथील एका महिलेचे सुमारे दोन लाख पंधरा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने ,मनी मंगळसूत्र धूम स्टाईल चोरी गेली आहे. शिर्डी येथे पिंपळवाडी रोड येथे राहणाऱ्या रजनी रघुनाथ गोंदकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,
१० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ , ३५ वा. चे सुमारास मी व माझे पती राहते घरुन निघुन श्री साईबाबा मंदीराचे दर्शनाकरीता निघालो असता रोडने पायी जात
असताना आयोध्या हॉस्पीटल जवळील बालाजी किराणा स्टोअर्स समोर असताना समोरुन एका काळ्या रंगाचे मोटार सायकलवर दोन इसम हे जोरात आले त्यांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते. मोटार सायकल माझ्या जवळ आल्यावर मोटार सायकल चालकाने मोटार सायकलचा वेग कमी केला. व पाठीमागे बसलेल्या इसमाने माझ्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसुत्र व २० ग्रॅमचे मंगळसुत्र ओढुन पिंपळवाडी रोडने जोरात निघुन गेले,
त्यावेळी मी बघितले असता मोटार सायकल चालकाने काळ्या रंगाच्या शर्ट व पाठीमागील बसलेल्या इसमाने पांढ-या रंगाचे शर्ट घातलेले होते. १लाख १५ हजार रु किंमतीची २३ ग्रॅम वजनाची सोन्याचे मनी मंगळसुत्र तसेच एक लाख -रु किंमतीची २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र असे एकूण दोन लाख पंधरा हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरी गेले आहे.
म्हणुन माझी या अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध फिर्याद आहे. या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर ६१८ / २०२४ नुसार भादवि कलम ३०९ (चार )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.