‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी मुदतवाढ आणि कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. अशातच आज (3 जुलै) सकाळी सहा वाजल्यापासून शहरातील तलाठी कार्यालयाबाहेर महिलांच्या अक्षरशः रांगा लागल्या आहेत. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांनी लगबग सुरू केली आहे. मुख्य म्हणजे, ही योजना काय आहे? योजनेचं नाव काय? किती पैसे मिळणार? याबाबत अजूनही महिला संभ्रमित आहेत.
जाहिरात
दरम्यान ,अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना अतिशय महत्वाची असणार असल्याची बोलली जात आहे.