दोन अज्ञात व्यक्तींकडून एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
जाहिरात
दोघे गोळ्या झाडून घटनास्थळावरुन फरार झाले. अब्दुल मलिक यांना तीन गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.अब्दुल मलिक यांच्यावर मालेगावच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
मात्र मालेगावमधील उपचारानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात आलं आहे. हात, पाय आणि छातीत गोळी लागल्यामुळे मलिक यांची प्रकृती गंभीर आहे. रात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घटली.
घटनेची माहिती मिळताच मलिक यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
मलिक यांच्यावर कोणी आणि का? गोळीबार केला याचा पोलीस तपास करत आहेत.