अहमदनगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील काही भ्रष्ट दलाल पोलिसांवर कारवाई व्हावी म्हणून खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरु केले होते आज चौथ्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केल्यानंतर पोलीस महासंचालक यांनी १५ दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आज निलेश लंके यांचे उपोषण सोडण्यात आले ह्यावेळी थोरात म्हणाले कि सध्या काही पोलिसांमुळे अख्खे पोलीस खाते बदनाम होत आहे एका खासदाराला पोलिसांच्या लाचखोरी विरोधात उपोषणाला बसावे लागते हि शरमेची बाब आहे निलेश लंके म्हणाले कि ह्या जिल्ह्यात काही पोलिसांनी लाचखोरीत जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नाव बदनाम करून टाकले आहे दरमाह गुन्हे अन्वेषण विभाग २७ करोड रुपये दोन नंबर वाल्यांकडून खंडणी जमा करीत असते याची शासनाला तक्रार करून देखील शासनाने कुठलीही दाखल न घेतल्याने मला उपोषणाचे हत्यार उपसावे लागले होते त्यावर आज पोलीस महासंचालकांनी लेखी आश्वासन दिल्याने आपण उपोषण सोडले आहे हि चौकशी बाहेरील वरिष्ठ अधिकार्यां मार्फत व्हावी अशी मागणी केली आहे
जाहिरात