ह.सैलानीबाबा दर्गाह चे मुजावरजुबेर बिनसाद बाबा यांचे निधन
श्रीरामपूर – येथील हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट चे विश्वस्त आणी दर्गाह चे प्रमुख मुजावर जुबेर अवद बिनसाद (उर्फ सैलानी बाबा) यांचे आज पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय आवघे ३४ वर्ष होते.
तिरंगा न्यूज,बिनदास न्यूज चे संपादक असलम बिनसाद, मोटार वाहन व्यावसायिक सलिम बिनसाद, अब्बू बॅग हाऊस चे कलीम बिनसाद यांचे ते बंधू होत.
हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेको सामाजिक/ शैक्षणिक / अध्यात्मिक अशी अनेक विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविली आहेत, सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अशा एका समाजसेवकाचे अचानक निधन झाल्याने श्रीरामपूर शहराच्या सामाजिक क्षेत्रासह सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची अंत्ययात्रा हजरत सैलानी बाबा दर्गाह जवळ, वॉर्ड क्र. ३, श्रीरामपूर याठिकाणाहून आज ( दि.३१ जुलै २०२४ रोजी) दुपारी ४ वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थापासून निघणार असून वॉर्ड क्र.१ कॉलेज समोरील मुस्लिम कब्रस्तान या ठिकाणी त्यांचा दफनविधी होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,५ भावंडे असा परिवार आहे.