राहता प्रतिनिधी/ शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपला विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया संपल्यानंतर व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ राजेंद्र मदनलाल पिपाडा व लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ ममता पिपाडा, श्रृती पिपाडा, टविंकल पिपाडा, परीवारावाने एकत्रित जाउन मतदार केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीत जय पराजय ठरलेला असतो.
मात्र आपण कुठल्याही दडपशाहीला न जुमानता सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जो संघर्ष आज पर्यंत करत आलेलो आहे. त्याची पावती राहाता तालुक्यातील मतदार विजयी करून देतील. असा विश्वास राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केला.
डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले की, निवडणुकीत मतदाराचा आग्रह होता की, तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे त्यासाठी आपण पक्षाकडे देखील मोठा पाठपुरावा केला ,न्याय मिळेल अशी अपेक्षा होती परंतु अल्पसंख्याक समाजातील मी असल्याने मला तिकीट मिळाले नाही. पण मी खचलो नाही, जनमताचे पाठबळ ,गोरगरीब जनतेचा व साईबाबाचा आशिर्वाद व साईबाबा संस्थान कर्मचारी शेतकरी व्यावसायिक व्यापारी सहकारात माफक पगारावर काम करणारे हजारो कर्मचारी माझ्या पाठीशी होते.
काहीजण बरोबर होते तर काहींनी अप्रत्यक्ष नको त्रास म्हणून पडद्यावर न येता मोठी साथ दिली आहे. साईबाबाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे. विरोधकाच्या बरोबर साईचा आशिर्वाद नाही. अशी माझी धारणा आहे .तसे असते तर नगर मध्ये पराभव झालाच नसता यावर माझा मोठा विश्वास आहे. सलग ३५ वर्ष जे आमदार व मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी या मतदार संघाचे राहीले त्यांना याच मतदार संघात आपल्या विजयासाठी गुंतुन पडावे लागले .
त्याबरोबर झालेली दमछाक यातच सर्व काही आले आहे .फारसा राजाश्रय व आर्थिक परिस्थिती नसताना आपण जनहिताच्या दृष्टीने उमेदवारी केली.त्यामुळे २३तारखेला जो निकाल येणार आहे तो धक्कादायक राहणार असून मी विजयी होणार ,असा विश्वास असल्याचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी दैनिक साई दर्शनशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.व सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.