शिर्डी (प्रतिनिधी) नांदेड व नाशिक पोलीसाकडुन चोरीचे सोने घेतलेल्या शिर्डी सह राहता तालुका व कोपरगाव तालुक्यातील काही सराफाची झाडाझडती व चौकशी करण्यात येत आहे .
काहींना पोलीस स्टेशनला आणले आहे.तर काहींची चौकशी होत आहे. त्यामुळे राहाता व कोपरगाव तालुक्यातील
सराफा मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक व नांदेडची पोलिसांचे एक पथक शिर्डी राहता तालुक्यात दाखल झाले असून या नाशिक व नांदेड जिल्ह्यामध्ये सोन्याचे दागिने चोरी करून राहता व कोपरगाव तालुक्यात काही सरांफाना विक्री केली जात असल्याचे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर व सोन्याची दागिने चोरी करणारे गुन्हेगार सापडल्यानंतर त्यांनी चोरीचे सोने व दागिने कोणाला विकले या संदर्भात पोलिसांना पकडल्यानंतर माहिती दिल्याने पोलीस या आरोपींनी सांगितलेल्या सराफांकडे धाड टाकत आहेत.
असेच पोलिसांचे एक पथक आरोपीने सांगितल्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे एका सराफाकडे जाऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याला आरोपीने पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने विकल्याची समजते. त्याचप्रमाणे पोलीस पथकाने शिर्डीतील एका सोनाराची चौकशी केली आहे.
चोरीचे सोने दागिने घेणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे शिर्डीत सह राहता व कोपरगाव तालुक्यात कोणकोणते सोनार आपल्या दुकानात चोरीचे सोने खरेदी करतात यांचा पोलीस शोध लावत आहेत. ज्यांची नावे आरोपीने पोलिसांना सांगितले आहेत ती गुप्त आहेत .मात्र पोलीस अशा चोरीचे सोने घेणाऱ्यांवर कारवाई करणार का की हा सर्व प्रकार गुलदस्त्यात राहणार !अशी नागरिकांमधून मोठी चर्चा सध्या सुरू आहे.
कारण एकीकडे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी व परीसरात धुमस्टाईल चोराचा उच्छाद वाढलेला आहे. अनेक साईभक्त महिला तसेच शिर्डी व परिसरातील ग्रामीण भागातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ही ओरबडून स्टाईल पळविले जात आहे. हे चोरीचे सोन्याचे दागिने सोनाराला विकले जातात व त्या पोटी पैसे घेऊन भामटे ऐश करतात. अशी सर्रास चर्चा असताना असताना असे चोरी करणारे चोरटे ना पकडे जातात, ना चोरीचे सोने घेणारे सराफ पकडले जातात.
त्यामुळे असे धूम स्टाईल सोन्याचे दागिने ओरबडून पळणाऱ्या चोरट्यांची संख्या वाढत आहे. असे चोरीचे सोने स्वस्तात घेऊन मजा करणारे काही सराफ या परिसरात अधिक असल्याचे नागरिक बोलत आहेत. नांदेड व नाशिक येथील पोलीसांचे एक पथक चार चाकी असणाऱ्या नव्या कोरी गाडीत आरोपीला घेऊन तपासासाठी तेच आले होते. चोरीतील सोने ज्यानी घेतले त्या सराफांना देखील चौकशी साठी बोलावण्यात आले होते. पकडून आणलेला 30वर्ष वयाचा संशयित आरोपी देखील बरोबर होता.
त्याने सांगितलेली नावे या वरुन हे सराफ चौकशी साठी बोलावण्यात आले .त्या सराफा बरोबर त्याच्या मुलाच्या मोठ्या चकरा पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू होत्या . सकाळ पासून हि प्रक्रिया सुरू होती. त्यात असलेली सराफाची संख्या बघता यात बरेच काही सोन्याच्या खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला होता. धास्तावलेले सराफ आपल्याला कोणी बघितले तर नाही याची काळजी घेताना दिसून येत होते.
पकडून आणलेला चोरटा ही निवांतपणे गाडीतून येणाऱ्या जाणाऱ्या पोलीस स्टेशन मधील लोकांकडे टकामका बघताना दिसत होता. या चौकशी मध्ये काय कारवाई झाली किती सोने हस्तगत झाले, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले, याची माहिती मात्र उशिरा पर्यंत मिळाली नसली तरी या घटनेनंतर शिर्डी शहरातील काही सराफ चोरीचे सोने घेतात हिच चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. याची माहिती लवकरच प्राप्त होईल.
मात्र तालुक्यातील काही सराफ आपली दुकाने बंद करून फरार झालेले दिसले. पोहेगाव आणि शिर्डी येथील एका सोनाराने चोरीचे सोने घेतले असल्याचे त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनला आणले होते. त्यांच्या कडून पोलिसांनी चौकशी केलेली आहे धुमस्टाईल चोरी असो किंवा चोरी सोने गेल्यावर त्या साई भक्त महिला यांचा आक्रोश वरिष्ठ अधिकारी कधी ऐकणार आहे
असा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी , पुढे काय कारवाई झाली आजून गुलदस्त्यात आहे. मात्र त्यामुळे शिर्डीसह राहता व कोपरगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.