शिर्डी प्रतिनिधी/ मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास राहता तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असलेल्या सावळीविहीर फाटा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे व पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करत असताना
रात्री बारा वाजून ३० मिनिटांनी एका ग्रे रंगाची इनोव्हा कार क्रमांक एम एच १४ बी आर ७८७१ ही समृद्धी महामार्गावरून उतरुन कोपरगावच्या दिशेने शिर्डीकडे येत असताना तिची तपासणी केली असता तिच्या मागील डिक्कीची तपासणी केली असता त्यात उग्र वास आल्याने खात्री केली असता ४६ पाकिटात अंदाजी ९६ किलो वजनाचा गांजा मिळून आला सदर गांज्याची किंमत अंदाजे १४ लाख ४३ हजार असून चार चाकी वाहनाची किंमत अंदाजे १२ लाख रुपये व दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा २६ लाख ५३ हजार ४०५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची
माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली सदरचा गांजा हा अर्जुन धोंडीराम कांबळे वय ३७ वर्षे राहणार निमगाव कोराळे ता राहता याच्याकडे मिळून आला असून तो गांजा कुठून आणला तसेच तो कोठे विक्री करणार होता त्याबरोबर त्याला आणखी कोणी साथीदार आहे का याचा देखील आतिशय बारकाईने शोध सुरू असून त्याच्या विरोधात एन डी पी एस कायद्याप्रमाणे
गुन्हा रजिस्टर नंबर ६७७/२०२४ एन बी एस अक्ट कलम ८ क 2 ( बी) १
(!!) (सी) अन्वये पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदरची कारवाईत पोलीस कर्मचारी गजानन गायकवाड गणेश घुले केवल राजपूत प्रसाद सुर्यवंशी यांनी भाग घेतला