काही महिन्यांपूर्वी सलमाननं त्याच्या सिकंदर या सिनेमाची घोषणा केली होती. यानंतर त्यानं शूटिंगलाही सुरुवात केली होती. मात्र आता सलमाननं मोठा निर्णय घेत या सिनेमाचं शूटिंग थांबवलं आहे. सध्याचं वातावरण पाहाता इतरत्र शूटिंग करणं धोक्याचं ठरू शकतं, त्यामुळं आता सलमानला कोणताही धोका पत्करायचा नाहीये, याच मुळं त्यानं सिकंदरचं शूटिंग पुढे ढकललं आहे.सलमानच्या जीवालाही धोक्या असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. या सगळ्याचा परिणाम आता त्याच्या करिअरवर होणार असल्याचं दिसून येतंय.
या घटेनंतर सलमान खान त्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र आता यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे. सलमान खानच्या जीवाला धोका असल्यानं पोलिस यंत्रणेवरही याचा ताण आहे. गेल्या आठवड्यात सलमान खान यानं बिग बॉस १८ चं शूटिंग केलं, पण यासाठी तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. पण आता यापुढच्या शूटिंगसदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.