चेअरमन विठ्ठल पवारांच्या वतीने “अंकिताला” नवी कोरी सायकल भेट..!
नुकताच इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि शिर्डी शहरातील सर्व मराठी माध्यमांमध्ये सर्वाधिक 92.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेली श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाची अंकिता रोहिदास जवादे नामक विद्यार्थिनी हीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत
असताना श्री साईबाबा संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी तिची भेट घेत अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी साईबाबा कॉलेज ला प्रवेश घेण्याची मनीषा तिने व्यक्त केली असता विठ्ठल पवार यांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करू असे आश्वासन देत तिला कॉलेजला येण्या जाण्यासाठी सायकलची आवश्यकता असल्याने लागलीच नवी सायकल घेऊन देत तिच्या मार्गातील एक अडसर दूर केला
आज राहता येथे चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपले सहकारी संचालक रामा गागरे,राहता नगरपरिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल,सुभाष उपाध्ये यांच्यासह जात तिला नवी सायकल घेऊन दिल्याने तिच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकत होता.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल यांनी विठ्ठल पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत आभार मानले आहेत