शिर्डी( प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थानच्या वतीने लेंडी बागेसमोरील दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
श्री दत्तजयंती निमित्त लेंडीबागेतील श्री दत्त मंदिरात श्रीदत्त मुर्तीवर व पादुकांवर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर यांच्या हस्ते अभिषेक पुजा व श्रीदत्तात्रयांची आरती करण्यात आली.
यावेळी प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.
श्री.दत्तजयंती निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात ह.भ.प. ज्ञानेश्वरी रत्नपारखे, बीड यांचा श्री दत्त जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर, प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले तसेच मंदीर पर्यवेक्षक राजेंद्र पवार, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
श्री दत्त जयंती निमित्त श्री साईबाबा मंदीर, दत्त मंदीर व मंदीर परीसरात देणगीदार साईभक्त श्रीमती रजनी डांग यांच्या देणगीतुन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री.दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे अनेक साई पालखी व साई पदयात्री मोठ्या संख्येने आले होते.
त्याचप्रमाणे विविध वाहनातूनही साईभक्त मोठ्या संख्येने साई दर्शनासाठी आले होते. श्री साईबाबा मंदिरात तसेच इतर मंदिरात त्याचप्रमाणे लेंडी बागेतील श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. आकर्षक विद्युत रोशनाई मंदिर व परिसरात करण्यात आली होती.