शिर्डी, दि.१९ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अंतर्गत शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राहाता तालुक्यातील लोणी बु., लोणी खु. व कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, चासनळी, शिरसगाव येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश उप विभागीय दंडाधिकारी शिर्डी भाग शिर्डी यांनी मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट १८६२ चे कलम ३,४ व ५ मधील तरतुदी अन्वये जारी केले आहेत.
जाहिरात