राजकीय
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
अहमदनगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात दि. १३ मे, २०२४ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नेवासा तालुक्यातील घोगरगाव, सलाबतपुर, भेंडा बु., माळीचिंचोरा, कांगोणी, गळनिंब व माका येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश उप विभागीय दंडाधिकारी नगर भाग अहमदनगर यांनी मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 3,4 व 5 मधील तरतुदी अन्वये जारी केले आहेत.
जाहिरात