Blog
मतदान संपण्याच्या दोन दिवस आधी आणि मतमोजणी च्या दिवशी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश
सर्व दारू विक्रेत्यांनी आपले दुकानातील (अनुज्ञप्त्या) देश व विदेशी, इतर अनुज्ञप्त्या असलेल्या दारूची विक्री मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस बंद ठेवावी. असे ही आदेशात नमूद आहे.
जाहिरात
या कार्यक्षेत्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक क्र.१ व क्र.२ यांनी मद्याची विक्री, वाहतूक व दुकाने (अनुज्ञप्त्या) उघड्या राहणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्ती (दारू विक्री दुकान) चा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. अशा सूचना ही जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी त्यांच्या आदेशात दिल्या आहेत.