शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी हे श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे येथे देश-विदेशातून साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात. मोठ्या श्रद्धेने साईबाबांचे दर्शन व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु अनेकदा साई भक्तांना शिर्डीत आल्यानंतर वेगवेगळे वाईट अनुभव येतात तसेच चांगले अनुभव येतात. असाच एक चांगला आणि सुखद अनुभव एका वयस्कर जोडप्या साई भक्तांना आला. अशी माहिती खुद्द संरक्षण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी दिली आहे.
रोहिदास माळी यांनी म्हटले की,परवा माझ्या ऑफिस ला एक वयस्कर साईभक्त जोडपे आले. आजोबांचे वय 82 वर्ष तर आजींचे वय 77 वर्ष. दिल्लीचे राहणारे साईबाबांचे निस्सीम भक्त होते.व ते मला म्हणाले कि आम्ही वयस्कर आहोत व आमच्या दोघांचे पाय आणि घुडगे दुखतात. दिनांक 30/11/2024 रोजी पर्यंत आम्ही शिर्डीत आहोत. गर्दीमुळे आम्हाला दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहता येत नाही. गावकरी गेट ने आम्हाला प्रवेश द्यावा. बुजुर्ग साईभक्त असल्याने आपण सेक्युरिटी गार्डला सांगा, ते गेटवर आपल्याला सोडतील, असे मी त्यांना सांगितले.
पण ते म्हणाले कि कधीकधी सांगितले तरी ते सोडत नाहीत. तेव्हा मी एका कागदाचे चिरोटीवर लिहून दिले कि ” दि. 30/11/2024 पर्यंत गावकरी गेट दोन व्यक्ती ( पती – पत्नी ) येथील त्यांना लवकर येत नाही सोडा ते वयस्कर आहेत. आणि त्याखाली माझी सही केली. काल त्यांना गावकरी गेट ने सुरळीत प्रवेश मिळाला. त्यांनी मनोभावे साईबाबांचे दर्शन त्यांना मनस्वी खूप आनंद झाला. शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या वयस्कर साईभक्तांशी नम्रतेने व्यवहार करणेबाबत सुरक्षा कर्मचाऱ्यांना माझ्या कायम सूचना असतात.
या वयस्कर साई भक्तांनाही त्यामुळे त्यांना मंदिरात अतिशय चांगला अनुभव आला, वयस्कर असल्यामुळे संरक्षण कर्मचारी यांनी त्यांना योग्य मदत केली. या सर्व गोष्टींनी भारावून जाऊन त्यांनी काल साईबाबा संस्थान ला 1,00,000/- ( एक लाख रु ) दान केले आणि आज मला भेटायला आले.
त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांचा सत्कार केला. त्यांना अतिशय आनंद झाला. नोकरी करत असतांना आपण जर संवेदनशील राहिलो तर किती सकारात्मक रित्या काम होते . याचा प्रत्यय नित्य येतो. त्यामुळे साई भक्तांशी प्रत्येक संस्थान कर्मचाऱ्यांनी, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नम्रतेने ,आपुलकीने वागले पाहिजे. असेही त्यांनी म्हटले आहे.