शिर्डी येथील पवित्र असणाऱ्या पालखी रोडवर काही लालची हॉटेल चालक वेश्याव्यवसाय करून घेत असल्याने पालखी रोडचे पावित्र्य धोक्यात आणले आहे शिर्डी सारख्या जागतिक देवस्थाच्या ठिकाणी, हॉटेल व्यवसायाच्या आडून सुरू असलेल्या… हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाया विरोधात पुन्हा शिर्डी पोलिसांनी कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत…
शिर्डीचे धार्मिक पावित्र्य राखण्याकरिता, अनेक वेळा पोलिसांकडून सूचना देऊनही… हॉटेल व्यवसायाच्या आडून वेश्या व्यवसाय होत असल्याचे, यापूर्वी देखील पोलिसांच्या कारवाईमुळे समोर आले आहे… अशाच प्रकारे शिर्डीतील पालखी रोड नजीक असलेल्या, हॉटेल साई वसंत विहार येथे… हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच,शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने सापळा रचून… देहविक्रीसाठी आणलेल्या ३ पीडित मुलींची सुटका करत,वेश्याव्यवसाय चालक शुभम अदमने यास ताब्यात घेत. त्याच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.. शिर्डी पोलिसांनी हॉटेल व्यवसाया आडून, शिर्डीत सुरू असलेल्या “हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर” छापा टाकून केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली…
शिर्डीत पुन्हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपीसह ३ मुलींना घेतले ताब्यात