शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर शिर्डी पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.चालक फरार होता.मात्र पोलीसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे.व या आरोपीचे नाव विशाल रमेश जाधव वय 33 वर्ष गणेश वाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असे आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि,अ, नगर जिल्ह्यातील शिर्डी शहर व परिसरात अवैध व्यवसाय रोखण्यासाठी शिर्डी पोलीसांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी विविध कारवाया गेल्या काही दिवसापासून सुरू आहे.
त्या अनुषंगाने अवैध पध्दतीने दारु वाहतूक करत असलेल्या वाहनावर देखील बारकाईने लक्ष केंद्रित करण्यात आले असता ३० नोव्हेंबर रोजी खबरीने सावळीविहीर परीसरात एका चार चाकी वाहनातून विना परवानगी दारू विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सपोनि भारत बलैया पोलीस नाईक गजानन गायकवाड पोलीस कर्मचारी डि व्ही पवार एस के दातीर बाबासाहेब खेडकर गणेश घुले सोमेश गरदास आनिल उजागरे यांनी शिताफीने सावळीविहीर खुर्द शिवारात रात्री सापळा लावला असता एका चार चाकी वाहनास थांबण्यासाठी इशारा केला असता
अज्ञात चालकाने गाडी सोडून पळून गेला असता स्विफ्ट डिझायर एम एच ०२ , बी टी ३०९९ या वाहनाची तपासणी केली ,त्यात वेगवेगळ्या कंपनीच्या १८० दारुच्या ६५५२० रूपये किमतीच्या दारु बाटल्या व ४लाख ५०हजार रुपये किमतीचे वाहन असा एकुण ५लाख १५ हजार ५२० रुपये रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चालक फरार होता. या अज्ञात चालकाच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस नाईक गजानन गायकवाड यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा रजिस्टर नंबर ६५२/ मुंबई प्रोव्हिंजन कलम १६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विशाल रमेश जाधव या आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अण्णासाहेब दातीर हे अधिक तपास करत आहेत.