शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या राहता व कोपरगाव तालुक्यातील रिक्त 57 पोलीस पाटील पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजित असून त्या अनुषंगाने पोलीस पाटील पदांचे गावनिहाय प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षण निश्चित करण्यासाठी २६ डिसेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता पंचायत समिती सभागृह व तहसील कार्यालय राहता येथे आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे.
अशी माहिती शिर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
शिर्डी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राहता तालुक्यातील 22 व कोपरगाव तालुक्यातील पस्तीस असे एकूण रिक्त 57 पोलीस पाटील पदे असून त्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून या रिक्त 57 पोलीस पाटील पदांसाठी गावनिहाय प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी आरक्षण सोडत करण्यात येणार असून 26 डिसेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता राहता तहसील कार्यालय इमारतीमध्ये हे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर अंजनापुर कोकमठाण दाऊद खुर्द चांदेगव्हाण बोलकी करंजी बुद्रुक, भोजडे ,पढेगाव उक्कडगाव बोधेगाव आपेगाव कान्हेगाव नाटेगाव माळेगाव देवी हांडेवाडी वेळापूर वडगाव ,मढी खुर्द ,देर्डे चांदवड, घारी ,मळेगाव थडी, येसगाव सोयगाव दहेगाव बोलका, मल्हारवाडी, कुंभारी खिर्डी गणेश, मढी बुद्रुक, तिळवणी, माहेगाव देशमुख सुरेगाव बुद्रुक सोनारी ,मुर्तीपुर तसेच राहता तालुक्यातील गोगलगाव, दाढ बुद्रुक, पिंपरी लौकी, हसनापूर ,लोहगाव, तिसगाव, पिंपरी निर्मळ, पिंपळवाडी ,रुई ,नांदुरखी बुद्रुक केलवड बुद्रुक एकुरखे, शिंगवे, रांजणगाव खुर्द ,धनगरवाडी, लोणी बुद्रुक ,रामपूर वाडी, आडगाव बुद्रुक, पाथरे बुद्रुक, पिंपळस ,नांदूर खुर्द ,चंद्रपूर, गावातील रिक्त पोलीस पाटील पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे.
Lo
तरी यावेळी अधिकारी व गावातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.अशी माहिती शिर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.