Letest News
शिर्डी पोलीस उपविभागीय सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सन 2024 मध्ये मोटरसायकल चोरीचे 241 गुन्हे! तिरुपती येथे दर्शन टोकन घेण्यासाठी उडाली धांदल! चंद्राचेंगरीत सहा जण ठार! काही जखमी! साई संस्थान मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रभू नयन फाउंडेशन व चार्ल्स ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद... विष प्राशन केलेल्या त्या माजी नगरसेवकाचे अखेर निधन ? भारतीय क्रिकेट संघांचे खेळाडू सुर्यकुमार यादव साईचरणी नतमस्तक रुग्णालय तसेच संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे--डॉ. राजेंद्र पिपाडा यांची मुख्यमंत्री देवें... जीवनात चढ-उतार येतात. या चढउतारातून मार्ग मिळू दे अडचणींचा सामना करण्याची शक्ती दे! अशी साईचरणी केली... साईबाबा संस्थानच्या अन्नदान फंडाचा वापर झाला नाही तर मोठी कर आकारणी पडणार!---- साई संस्थांनच्या निरोपोगी डेट स्टॉक साहित्याचा 9 जानेवारीला जाहीर लिलाव! आठ जानेवारीला सायंकाळी पाच ... नायलॉन मांजा विक्री करणारे व हा मांजा खरेदी करणारे या सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी
अ.नगरशिर्डी

साई संस्थान मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रभू नयन फाउंडेशन व चार्ल्स ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तीन चाकी सायकलचे मोफत वाटप!

शिर्डी ( प्रतिनिधी)श्री साईबाबा संस्‍थानमधील दिव्‍यांग कर्मचा-यांना तीनचाकी सायकल वाटप गुरुवारी करण्यात आले.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी तसेच प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे संयुक्‍त विद्यमानाने श्री साईबाबा संस्‍थान येथे कार्यरत असणा-या दिव्‍यांग कर्मचा-यांना तीनचाकी सायकलचे गुरुवार दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल येथे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से) यांचे हस्‍ते वाटप करणेत आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी श्री गाडीलकर यांनी श्री साईबाबा संस्‍थान कर्मचारी यांना सायकल उपलब्‍ध करुन दिलेबद्दल प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे आभार व्‍यक्‍त केले. अशाच प्रकारच्‍या अन्‍य संस्‍थांनी पुढे येवुन येथील विविध उपक्रमामध्‍ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.


यावेळी प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे पदाधिकारी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद अय्यर श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, अधिसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी रूग्‍णालये सुरेश टोलमारे, स्‍टोअर मॅनेजर शितल कथले, बायोमेडीकल वेस्‍ट मॅनेजमेंट विभागाचे सचिन टिळकेर, यांचेसह कपिल बालोटे, सुरेंद्रकुमार पांडे तसेच श्री साईबाबा संस्‍थानमधील दिव्‍यांग कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रूग्‍णालये सुरेश टोलमारे यांनी केले तर आभार उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी मानले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button