बूट पॉलिश करणारा चांभार हा विषय चित्रकला स्पर्धेकरिता दिल्याने जातीय व्यवस्थेत प्रचार प्रसार होण्यास पूरक आहे म्हणून बालकांना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या माध्यमातून जातीयता वाढीसाठी हा विषय हेतू पुरस्कार देणे अत्यंत व असंविधानिक आहे यामुळे चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या आहे शासन स्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दलित शब्द किंवा जाती जातीत सलोखा राहावा जातीचा उल्लेख कुठे होऊ नये म्हणून जातीच्या वस्त्या यांना महापुरुषांचे नावे देऊन नव्याने नामकरण करण्याचे काम सुरू असतांना शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पिढी घडवतांना जातीयतेचे विष पेरण्याचे समाजद्रोही काम या घटनेतून केलेले आहे. अशा जातीयवादी अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे या कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. शिक्षण विभागाचे हे कृत्य जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रचार व प्रसार शालेय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून होत आहे.
चर्मकार विकास संघाच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा चर्मकार विकास संघ महाराष्ट्रात मोठे आंदोलन छेडल याची नोंद घ्यावी. असा इशारा प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिला आहे
जाहिरात