Letest News
पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं राहुल गांधी ना.राधाकृष्ण विखे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांचा लोणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार! shirdi news साईंच्या झोळीत साईभक्तांनी टाकले भरभरून दान गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य साईंची मूर्ती खरंच झीझली आहे का? तज्ञांनी दिलेल्या सुचनेने चर्चेला उधान!!साई संस्थान मूर्तीची काळजी ... बनावट दर्शन पास या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद का नाही? shirdi saibababa news श्री साईबाबा संस्थानची नाताळ व नूतन वर्षाची तय्यारी पूर्ण प्रशासन सज्ज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड...
Blog

पत्रकार दिनी मोहसिन ए मिल्लत चे प्रकाशन

श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील सर्व बारा कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाची व लाभदायक ठरणारी पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विविध आजारांवरील उपचारासाठी होणारा ५ लाख रूपयांपर्यंतचा खर्च राज्य सरकार देणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केले.
ज्येष्ठ संपादक शौकत शेख व त्यांचे चिरंजीव मोहसीन शेख यांनी पत्रकारदिनी सुरू केलेल्या “मोहसिन-ए-मिल्लत” या मासिकाच्या प्रकाशनप्रसंगी येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट समोरील संत मदर तेरेसा सर्कल प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाजी इलाहिबक्ष कुरेशी हे होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


मासिकाचे संपादक मोहसिन शेख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संपादक शौकत शेख,
माजी नगरसेवक नजीर मुलाणी, महेबुब कुरेशी, तौफिक शेख, असिफ तांबोळी, जाफर शहा, सलाऊद्दीन शेख, मुखतार मनियार,असलम बिनसाद, हाजी लतीफ सय्यद, रियाजखान पठाण, स्वामीराज कुलथे, विजय खाजेकर, डी.एल.भोंगळे, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मिलिंदकुमार साळवे म्हणाले, महाराष्ट्रातील झोपडपट्टी पासून ते महालापर्यंत राहणाऱ्या सर्व आर्थिक व सामाजिक घटकातील वर्गाला ५ लाख रूपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करणाऱ्या या मोफत आरोग्य विम्याचा गोरगरीब जनतेस मोठा लाभ होणार आहे.
२८ जुलै २०२३ रोजी या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा कुटुंबांचा म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्नपूर्णा व दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक यांचा या योजनेत समावेश होता. पात्र कुटुंबाला मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले होते. यासाठीचा विमा हप्ता महाराष्ट्र सरकार भरत होते. त्यामुळे रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१४ मध्ये या योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करून यासाठी मंत्रालयात विशेष कक्षही सुरू करण्यात आला. दरम्यान २३ सप्टेंबर २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात केंद्र सरकारची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून लागू केली. १ एप्रिल २०२० च्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्याच्या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी सुरू झाली. केंद्राच्या योजनेत ५ लाखांचा, तर राज्याच्या योजनेत दीड लाख रुपये प्रति कुटुंब, प्रतिवर्ष आरोग्य विमा संरक्षण लाभ देय करण्यात आला.

२८ जुलै २०२३ ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्य अशा दोन्ही योजनांची एकत्रित सांगड घालून महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या सर्व १२ कोटी जनतेला सरसकट ५ लाख रूपयांचे आरोग्य विमा संरक्षण लागू करण्यात आले. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना सुधारित महात्मा फुले ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. विम्याचे पैसे महाराष्ट्र सरकार संबंधित विमा कंपनीस देणार असल्याने १२ कोटी महाराष्ट्रवासियांना योजनेच्या यादीतील रूग्णालयांमधून ५ लाख रूपये खर्चापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत, असेही साळवे यांनी सांगितले.

सध्या यांना मिळते केंद्राचे कार्ड

सध्या २०११ च्या सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षणाच्या यादीत नाव असणारांनाच केंद्र सरकारच्या योजनेचे कार्ड ऑनलाईन मिळत आहे. त्यासाठीही शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक व आधार क्रमांक गरजेचा आहे. अनेकांकडे शिधापत्रिकेचा बारा अंकी ऑनलाईन क्रमांक नसल्याने त्यांना हे कार्ड मिळत नाही. त्यामुळे शिधापत्रिकेऐवजी थेट आधार क्रमांक व मतदार ओळखपत्राद्वारे रहिवासी असल्याची खात्री करून नव्या योजनेचे कार्ड तातडीने वाटप करण्याची मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

यामुळे रखडली योजना

kamlakar

अंमलबजावणी सहाय्य संस्था व अंगीकृत रूग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती, योजनेच्या आज्ञावलीत बदल, राज्य आरोग्य हमी सोसायटी स्तरावर मनुष्यबळ नियुक्ती, एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्या विमा कंपनीची निवड अशी कार्यवाही न झाल्याने योजना मंत्रालयात रखडली आहे.

जनतेतून साकारली योजना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार मी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी किमान ५ लाख रूपयांचा आरोग्य विमा (मेडिक्लेम) योजना लागू करण्याची सूचना केली होती. तिची दखल घेऊन ही योजना साकारली, याचा आनंद आहे. शासन जनतेचा आवाज ऐकते,याचा प्रत्यय यातून आला. मंत्रालयातील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून तातडीने योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे.

–मिलिंदकुमार साळवे, मिशन वात्सल्य शासकीय समिती, महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समिती.

प्रत्येक समाजातील महिलांनी पुढे येवून प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवणे गरजेचे – दिपालीताई ससाणे

पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मोहसिन ए मिल्लत या वर्तमानपत्र प्रकाशन सोहळ्यात महिलांचा मोठा सहभाग लाभला
या कार्यक्रमास महिलांसाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव दिपालीताई ससाणे यांच्या हस्ते यावेळी मोहसिन शेख संपादित मोहसिन ए मिल्लत या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी मोहसिन ए मिल्लत या वृतपत्रास शुभेच्छा व्यक्त करताना आपल्या शुभेच्छापर भाषणात सौ.ससाणे म्हणाल्या की, महिलांनी चुल आणि मुल यापर्यंतच मर्यादित न राहता प्रत्येक समाजातील महिलांनी प्रत्येक कार्यक्रमात पुढे येवून कामे केली पाहिजेत असे प्रोत्साहनही यावेळी त्यांनी महिलांना दिले. तसेच या कार्यक्रमात महिला भगीनींची मोठी उपस्थिती पाहून तथा मोहसिन ए मिल्लत या वृतपत्राच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहुन मनाला मोठे समाधान मिळाले असल्याचे ते म्हणाल्या.

यावेळी महेबुब कुरेशी, हाजी लतीफभाई सय्यद,नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, जोएफ जमादार, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, मुखतार मनियार, आसिफ मनियार, असलम बिनसाद, विजयराव खाजेकर , शौकत शेख, ॲड. मुमताज बागवान, सलवा शेख, फरजाना शेख आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी बोलताना शौकत शेख म्हणाले की ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुमार साळवे यांनी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही खुपच सविस्तरपणे याप्रसंगी दिली आहे,
मोहसिन ए मिल्लत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देखील घराघरात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याची कामे केली जाणार असुन त्या अनुषंगाने अभा कार्ड/ आयुष्यमान भारत कार्ड कार्ड/ ई- श्रम कार्ड/ पेन्शन कार्ड याची सविस्तर माहिती सदरील अंकात सविस्तरपणे प्रकाशित करण्यात आलेली आहे, याप्रमाणेच शासनाच्या आणखी ज्या काही विविध जनकल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती देखील प्रत्येक अंकात सविस्तरपणे दिली जाणार आहे, आमच्या मोहसिन ए मिल्लत कमेटी चा उद्देश केवळ हाच आहे की शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही तळागळातील जनसामान्यांपर्येंत पोहोचावी आणी त्यात त्यांचा फायदा व्हावा,शासनाने त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची त्यांना घरबसल्या माहीती मिळावी,यासाठी खास करुन सदरील कामी कार्यरत असलेल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील क्रमाक्रमाने या अंकात सविस्तरपणे प्रकाशित केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, हाजी लतीफभाई, महेबुब कुरेशी, जाफर शाह, शेख नजीर गफूर (मामु), जोएफ जमादार, तौफिक शेख (एकता), शेख शब्बीर (सर), अजहर शेख (एबीएस), असिफ तांबोळी, फिरोज शेख, रज्जाक पठाण, शेख जाकीर (सर), मास्टर सरवरअली सय्यद, सलाऊद्दीन शेख, इब्राहिम शेख, असलम बिनसाद, इम्रान एस. शेख, विजयराव खाजेकर, दशरथ भोंगळे, प्रविण साळवे, डॉ. पंडितराव पगारे, रमाताई भालेराव, परवीनभाभी शाह, विजय पाठक, दिलीप शेंडे (सर), ॲड.मुमताज बागवान, हाजी साजीद मिर्जा, शकील बागवान (सर), जलील कुरेशी (सर), समीर बागवान, लकी सेठी, जावेद पिंजारी, अजिज अत्तार, असिफ मंडपवाले, पत्रकार बाबासाहेब चेडे, राजेश भवार, नंदकुमार बगाडे, सचिन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहसिन ए मिल्लत कमेटी चे शौकतभाई शेख, मोहसिन शेख, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, ॲड. हारुन बागवान, नदीमताज गुलाम, शब्बीर (राजु) कुरेशी , सरताज शेख, आरिफ कुरेशी, इब्राहिम बागवान (सर), मो.शफी अन्सारी, अफजल मेमन, मोहसिन बागवान, शब्बीर शेख, जावेद शेख, युनूस कुरेशी, हाजी फयाज बागवान, मुखतार मनियार, कलीम शेख, जाकीर शाह, समदानी शाह,जुबेर पटेल, वाजीद शेख तसेच सलवा शेख, फरजाना शेख,जेबा शाह, हिना मुलाणी, आस्मा सय्यद, जबीन पटेल, निलोफर बागवान, आर्शिया नदीम गुलाम, पूजा सकट, अनम खान आदिंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मोहसिन ए कमेटीचे कार्याध्यक्ष हाजी इलाहिबक्ष कुरेशी यांनी आभार मानले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button