पुंड यांना सापडले साईभक्तांचे पैशे आणि भालेराव यांना दागिने दोघांनी प्रामाणिकपणे केले परत संस्थान कडून दोघांचा सन्मान
काल गुरुवारी साईबाबांच्या पालखी मध्ये साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ श्री पंकज भालेराव याना कानातील सोन्याचा दागिना सापडला. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सदर चा दागिना संरक्षण ऑफिस ला जमा केला.आज रोजी श्री साईबाबा संस्थान चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवले यांनी श्री पंकज भालेराव यांचे प्रामाणिक पानाबाबत कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
काल दिनांक २०/०६/२०२४ रोजी आंध्रा प्रदेश येथील महिला साईभक्त श्रीमती बेबी सरोजिनी यांचे समाधी मंदिर गाभाऱ्यामध्ये ३१६० रुपये हरवले होते ते पैसे संरक्षण विभाग पहारेकरी श्री शिवाजी बबन पुंड यांना सापडले असता संरक्षण ऑफिस मध्ये जमा केले. साईभक्तांनी संरक्षण ऑफिस येऊन त्यांचे पॆसे घेतले
आणि संरक्षण विभागातील कर्मचारींचे आभार व्यक्त केले. आज रोजी जेव्हा सुरक्षा रक्षक श्री पुंड यांना मी अभिनंदन करणेकरीता ऑफिस ला बोलवले असता, त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची मुलगी होती. मुलगी शाळेत अतिशय हुशार आहे. ती यशाच्या पायऱ्या चढत आहे. हेच प्रामाणिकपणाचे आणि साईबाबांच्या सेवेचं फळ आहे असे ते म्हणाले. त्यांच्या मुलीच्या डोळ्यात देखील आपल्या बापाबद्दल अभिमान झळकत होता.