प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांचं ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं देश शोकसागरात बुडाला आहे. एक सच्चा देशभक्त, संवेदनशील माणूस, द्रष्टा उद्योगपती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
जाहिरात
रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. टाटांच्या निधनाबद्दल सगळ्याच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यातील सगळ्या शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आलेले आहे. मनोरंजनाचे, करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईत राज्य शासनाचे आज अनेक कार्यक्रम नियोजित होते.
ते सगळे कार्यक्रम शासनाकडून रद्द करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम उद्या घेण्यात येतील, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.