शिर्डी प्रतिनिधी/ साईच्या दर्शनासाठी कोट्यवधी भाविक येतात दानपेटीत भक्त सोने चांदी हिरे नानी रोख रक्कम टाकतात तर काही जण गुप्त दान करतात मागिल वर्षात संस्थानला ८१९ कोटी उत्पन्न मिळाले गुंतवणूक तर २९१६ कोटी पर्यंत पोहचली मागिल वर्षापेक्षा ४१९ कोटीची वाढ झाली आहे साईभक्त भाविकांना भोजन चहा पान नाष्टा निवास आरोग्य सुविधा देते ३१ मार्च २४ अखेर २९१६ कोटीची गुंतवणूक साईबाबा संस्थानने केली आहे साईभक्त भाविकांना चागली सेवा सुविधा यामुळे कुबेराच्या दानपेटीत दान वाढत आहे
३१ मार्च २४ अखेर २९१६ कोटीची गुंतवणूक , मार्च २०२४ वर्षात दानपेटीत १७६ कोटीचे दान, सर्वसाधारण देणगी १२१ कोटी प्राप्त , सोने चांदी मौल्यवान खडे दानपेटीत मिळाले मुल्य ११ कोटी अन्नदान निधी ९६ कोटी, रुग्णालयासाठी ५४ कोटी, प्रसादालय ४६ कोटी, इमारत दुरुस्ती ३२ कोटी, वस्तू स्वरूपात ८ कोटी, असे ८१९ कोटीचे उत्पन्न मिळाले तसेच 2९१६ कोटीच्या गुंतवणूकी वरील व्याज २०० कोटी याचा समावेश आहे भविष्यात आणखी सुविधा साईबाबा संस्थान देणार आहे