शिर्डीत नवीन साई दर्शन रांगेच्या
प्रवेशद्वारासमोर चप्पल स्टॅन्ड ची संख्या संस्थांनने वाढवली !
दै.साईदर्शनचे वृत्त व संस्थान व्यवस्थापनाला दिलेले पत्र आणि साई भक्तांची मागणी हिला आले यश!
शिर्डी( प्रतिनिधी )शिर्डी येथे साई संस्थानने सर्व सुविधा युक्त अशी साईभक्तांसाठी दर्शन रांग इमारत बांधली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते या दर्शन रांगेचे उद्घाटन झाल्यानंतर ती साईभक्तांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर साई भक्तांना दर्शनासाठी या दर्शन रांगेतून जावे लागते. मात्र जाताना या नवीन दर्शन रांगेबाहेर चपला काढाव्या लागतात. शिर्डीला साई भक्तांची नेहमी गर्दी असते. अशावेळी साई भक्तांना साई दर्शनाला जाण्याची मोठी आस असते. दर्शन रांगेत जाताना साईभक्त हे चपला बाहेर काढून दर्शन रांगेत प्रवेश करतात. नवीन दर्शन रांग झाल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ साई संस्थानने अधिक चप्पल स्टॅन्ड टाकणे गरजेचे होते . मात्र तसे न केल्यामुळे साई भक्तांना दर्शन रांगेच्या बाहेर चप्पल मोकळी सोडून आत मध्ये प्रवेश करावा लागत होता व दर्शन करून आल्यानंतर आपल्या चपला सापडत नव्हत्या. त्यामुळे येथे चपलांचे ढग दिसून येत होते. नवीन साई दर्शन रांगेच्या प्रवेशद्वाराजवळ अधिक चप्पल स्टॅन्ड संस्थानने सुरू करावेत अशी मागणी साई भक्तांनी केली होती. दैनिक साई दर्शन नेही सदर सत्य परिस्थिती पाहून तसे वृत्तही प्रसिद्ध केले होते व साई संस्थांनचे अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांना नवीन दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारासह अधिक चप्पल स्टॅन्ड मोबाईल स्टॅन्ड टाकण्यासाठी पत्रही दिले होते. या वृत्ताची पत्राची दखल घेत श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती सुधाकर
यार्लागड्डा व मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी दखल घेऊन नवीन दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारासमोर अधिक चप्पल स्टॅन्ड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे साई भक्तांची मोठी सोय झाली आहे .साई भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे. साई संस्थांनचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुधाकर यार्लागड्डा व संस्थान प्रशासनाचे साई भक्तांकडून, ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. तसेच दैनिक साई दर्शन ने याचा पाठपुरावा केला याबद्दल दैनिक साई दर्शनलाही साई भक्त धन्यवाद देत आहेत.