शिर्डी
साईबाबा संस्थानच्या वतीने द्वारकामाईच्या सभामंडपात तुलसी विवाह पूजनाचा कार्यक्रम संपन्न
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार तुलसी विवाह श्री द्वारकामाई येथे साजरा करण्यात आला. तुलसी विवाह निमित्त आज सायंकाळी ०६.३० ते ०७.३० यावेळेत द्वारकामाईच्या सभामंडपात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्या हस्ते तुलसी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले. याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात