महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून मा.खा सुजय विखे यांच्या प्रयत्नातून प्रवरा परिवार आयोजित गणेश फेस्टिवल, राहता येथे सांस्कृतिक कार्यक्रमात श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले.
यात सहकारातून समृद्धीकडे नृत्याविष्कारात पद्मविभूषण, सहकार व शिक्षणमहर्षी कै. मा. विठ्ठलराव विखे पाटील यांचे सहकारी योगदान प्रेक्षकांसमोर मांडले या नृत्यास दुसरे पारितोषक मिळाले.
यात खालील विद्यार्थ्यानी विखे पाटील कुटुंबातील सर्व सदस्यांच्या व्यक्तिरेश्या हुबेहूब साकार केल्या व प्रेक्षकांनीही त्यास उस्फुर्त दाद दिली.
कै. पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील- श्लोक मनीष ततार
राधाकृष्ण विखे – कृष्णा मारुती दराडेसौ. शालिनी विखे – वेदिका सचिन कोते
सुजयदादा विखे – आराव सोमनाथ वर्पेसौ. धनश्री विखे – शुभ्रा अमोल दहीवाल
तसेच दुसऱ्या नृत्यात साई निर्माण निर्भय कन्या अभियान या थीमवर सध्या सुरू असलेल्या अन्याय,अत्याचार, मुलींची छेड यावर मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे यावर चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले व उपस्थित प्रेक्षक, पालक, पोलीस यांची मने जिंकली..
तसेच यामध्ये शालेय क्रिडा स्पर्घेत वॅालीबॅाल मॅचेसमध्येही विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदवत पारितोषिक पटकावले..
सहभागी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे कौतुक व हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विजय कोते उपाध्यक्ष ताराचंद कोते प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी केले.