साई संस्थान आरती दर्शन पास फसवणूक प्रकरण! अखेर त्या नगरसेवकाचे नाव झाले जाहीर!
शिर्डी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत साई संस्थांनच्या आरती दर्शन पासवर अधिक पैसे घेऊन साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या त्या प्रकारची येत्या 30 दिवसात अधिक चौकशी करून संबंधित माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन शिर्डी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिल्यानंतर सुरेश आरणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण आज सोमवारी पाचव्या दिवशी दुपारी मागे घेण्यात आले आहे.
शिर्डी येथे आरती दर्शन व्हीआयपी पास शिर्डीतील एका माजी नगरसेवकाने 3000 रुपये अधिक घेऊन त्या साईभक्ताला साई समाधी मंदिरात आरतीला फ्रंट लाईनला उभे करण्याचे अमिष दाखवून फसवण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण शिर्डीत मोठे गाजले. साई संस्थान कडेही तशी तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आदेश संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. मात्र या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल होत नसल्यामुळे शिर्डीतील इतर माजी नगरसेवकांकडे पाहण्याचा कल वेगळा झाला असल्याचे सांगत या पास विकणाऱ्या माजी नगरसेवकाचे नाव जाहीर करावे म्हणून येथील माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले होते.
या उपोषणाला हळूहळू पाठिंबा वाढत होता. आज सकाळी पत्रकार राजू भुजबळ व मामा पगारे हे ही उपोषणाला बसले होते. आज सोमवारी महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. नंतर साई संस्थांनच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणासंबंधी चौकशी केली. संस्थांनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.व पोलीस प्रशासनाकडून 30 दिवसाच्या आत तक्रार करणाऱ्या त्या साई भक्ताचा सध्या फोन लागत नाही मात्र फोन तसेच सर्व माहिती घेऊन ,चौकशी करून संबंधित माजी नगरसेवकावर तक्रार दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
दरम्यान या माजी नगरसेवकाचे नाव अशोक गायके उर्फ पप्पू गायके असल्याचेही यावेळी उपस्थित पत्रकारांनाही सांगण्यात आले. असून अधिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल. असे लेखीआश्वासन यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले. व त्यानंतर हे उपोषण पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. यावेळी अड.अविनाश शेजवळ, सचिन चौगुले, अड.अनिल शेजवळ, नाना काटकर, प्रकाश मामा पगारे, दिगंबर कोते, आदीसह श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी ,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके , सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी, शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ, आदींसह उपोषणकर्ते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपोषणकर्ते माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी उपोषण सोडल्यानंतर सांगितले की, माझ्या उपोषणाला अनेक ज्ञात अज्ञात, कार्यकर्ते, साई भक्त यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यांचे प्रथम मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व त्यांच्या पोलीस प्रशासनाने आज निर्णय घेतला व त्या माजी नगरसेवकाचे नाव जाहीर करुन त्यावर तीस दिवसाच्या आत अधिक चौकशी करून गुन्हा दाखल करू असे लेखी आश्वासन दिले. त्यांनाही धन्यवाद , तसेच महिला आयोगाचे सदस्या उत्कर्षा रूपवते यांनीही भेट दिली. संस्थान प्रशासन ,पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे त्यांचेही धन्यवाद असे सुरेश आरणे यांनी सांगितले. तसेच यावेळी पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र लेखी दिल्याप्रमाणे 30 दिवसाच्या आत त्या आरतीपासवर अधिक पैसे घेऊन साई भक्तांची फसवणूक करणाऱ्या त्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात यावा .असे सांगत त्यांनी यावेळी या माजी नगरसेवकाचे नाव अशोक गायके उर्फ पप्पू गायके असल्याचे सांगितले. जर तीस दिवसाच्या कारवाई झाली नाही तर त्यानंतर सुरेश आरणे यांच्या बरोबर आपणही पाणी न पिता मरेपर्यंत उपोषण करू व त्यांना साथ देऊ असे यावेळी पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी सांगितले.