साई संस्थान एम्लाॅईज सोसायटी निवडणूक बिगुल वाजला
साई संस्थान एम्लाॅईज सोसायटी निवडणूक बिगुल वाजला
शिर्डी प्रतिनिधी/ साईबाबा संस्थान एम्लाॅईज सोसायटीची निवडणूकीसाठी ११फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे
निवडणूक अधिकारी अशोक गाडे यांनी सांगितले ८ ते १२जानेवारी नामनिर्देशन पत्र दाखल करणे १५ जानेवारी छाननी १६ जानेवारी सुची जाहीर करणे १६ ते ३० जानेवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत ३१जानेवारी चिन्ह वाटप आतिम यांदी ११ फेब्रुवारी सकाळी ८ते ४ मतदान नतर मतमोजणी होणार आहे ५६ वर्ष जुनी संस्था आहे १६६६ सभासद २००दोनशे कामगार आहेत सर्व साधारण जागेसाठी १२ संचालक दोन महिला एक अनुसूचित जाती जमाती १भटक्या विमुक्त १इतर मागास वर्ग संचालकासाठी हि निवडणूक होत आहे
हि निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे सध्या विखे गटाची सत्ता आहे सध्या श्रध्दा कोते या चेअरमन आहेत राजेद्र जगताप यांनी अनेक वर्षे चेअरमन व एक हाती सत्ता त्याच्या ताब्यात होती तुषार शेळके यादवराव कोते प्रताप कोते विरोधी गटाचे विठ्ठल पवार अशी तीरगी चौरगी लढत होणार आहे खा डॉ सुजय विखे व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे साईबाबा संस्थान कामगाराची हि संस्था कामधेनू असुन कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारी हि संस्था असल्याने हि निवडूक चांगलीच रंगतदार होणार असून सभासद व भावि संचालक यांनी बैठका व जनसंपर्क सुरू केला आहे या सोसायटीच्या माध्यमातून साईभक्त भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात सभासद कामगार यांना माफक दरात कर्ज सुविधा देखील देण्यात येतात कागदपत्रे पुर्तता होताच तात्काळ कर्ज देणारी हि संस्था म्हणून हिचा नावलौकिक आहे