साईबाबा संस्थानने त्याच्या जागेतील विविध दुकाने टेडर पध्दतीने द्यावी अमृत गायके
शिर्डी प्रतिनिधी/ साईबाबा संस्थानने मंदिर परिसरातच साई प्रसादसह इतर व्यवसाय हे सर्व साई एम्प्लॉईज सोसायटीला दिल्यामुळे अनेक बेरोजगारांना उपासमारीची वेळ आलेली संस्थानने आपली जागा ही सोसायटीला मोक्याच्या ठिकाणी दिलेली आहे. त्यावर श्री.साईबाबा संस्थानचे कुठल्याही स्वरूपाचे निर्बंध नाही
त्यामुळे खरेदी करणाऱ्या साईभक्तांना आर्थिक फटका बसतो मंदिराच्या परिसरात दुकाने असल्याने हि दुकाने संस्थानची आहे असा गैरसमज होतो ,मोठ्या प्रमाणात दुकाने सुरू आहे साईभक्त हे मोबाईल लॉकर मध्ये ठेवत असतात,अमृतसरच्या तसेच शेगावच्या धरतीवर श्री.साईबाबा संस्थानने चार चाकी दुचाकी पार्कींग सुरू केली पाहिजे
सोसायटी कडून नेमका संस्थानला काय उत्पन्न मिळते असा प्रश्न अमृत गायके यांनी विचारला आहे श्री.साईबाबा संस्थानने ऑनलाइन टेंडर काढून शिर्डीतील व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.त्यातून नक्कीच श्री.साईबाबा संस्थानचा आर्थिक फायदा होऊन श्री.साईबाबा संस्थान चे उत्पन्नात वाढ होईल.
शिर्डी मधील शिर्डी विकास सोसायटी असेल शिर्डी शहरातील नागरी पतसंस्था असेल त्याचप्रमाणे शिर्डीतील महिला बचत गट असेल यांना श्री.साईबाबा संस्थानने व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी.याबाबत गांभीर्याने श्री.साईबाबा संस्थानचे त्रीसदस्यीय समितीचे घ्यावी अशी मागणी अमृत गायके यांनी केली असून निवेदनावर अनेकांच्या सह्या आहे