मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साईबांचरणी साकडे
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी येथे खा. सदाशिव लोखंडे व शिवसेना पदाधिकारी यांनी साईबाबांच्या चरणी लीन होत मुख्यमंत्री साहेबांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो तसेच येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी साईबाबा मंदिरात पादुकांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.
सदर प्रसंगी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री. कमलाकर कोते, संपर्क प्रमुख श्री. बाळासाहेब पवार, जिल्हा संघटक श्री. विठ्ठल घोरपडे, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. नितीन कापसे, श्री. प्रशांत लोखंडे, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ,संगमनेर तालुका प्रमुख श्री. राजेंद्र सोनवणे, दादासाहेब कोकणे, प्रदीप वाघ, शरद भणगे, सुनील गायकवाड, उमेश पवार,विनोद सूर्यवंशी, संतोष डहाळे, किशोर वाडिले, राहुल भंडारी,विठ्ठलराव शेळके, हरिभाऊ सोनवणे, महिला आघाडी सौ. मीनाक्षी वाकचौरे, सौ. सविता वाडिले, सौ. राजश्री वव्हाळ, सौ.आरती गाडे, विजया धोंड हे उपस्थित होते.