राज्यातील सर्वात हायटेक आणि बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पुढच्या आणि अंतिम टप्प्या सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गातील चौथ्या टप्पा इगतपुरी ते ठाणे दरम्यान 76 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
या टप्प्यात 16 पूल आणि 4 बोगदे बांधण्याच येत असून हे काम 95 टक्क्यांहून अधिक पूर्ण झालंय. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे. हा हायटेक समृद्धी महामार्ग ऑगस्ट-सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु होणार आहे.
खर्डीजवळ पुलाच काम सुरू असून हा पूल सुमारे 82 मीटर म्हणजेच 27 मजली इमारतीइतका उंची आहे. या महामार्गावरील पुलाचे कामही 97 टक्के पूर्ण झालाय.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने इगतपुरी ते मुंबईदरम्यान डोंगरातून बोगदा बांधण्याचं काम गतीने सुरु आहे. मात्र, दोन डोंगरांमधील उंच पूल बांधण्यासाठी बराच वेळ लागत आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 701 कि.मी. लांबीचा समृद्धी हा मार्ग पूर्णत्वाला जाणार आहे.
यापूर्वी महामार्गावरील 625 कि.मी. चा मार्ग वाहनांसाठी खुला झालाय.