प्रेम संबधात अडथळा व बदनामी केल्यास तुझ्या कडून शरीरसुख घेईल
राहता येथील व्यावसायिकाची
कामगार महिलेकडे मागणी
राहता प्रतिनिधी/ राहाता शहरात असलेल्या जितेंद्र एन एक्स या कापड दुकानात गेल्या तीन वर्षापासून सात हजार रुपये पगारावर राहता शहरातील २७ वय असलेली महिला तीन वर्षापासून काम करते कापड दुकानाचे मालक सार्थक जितेंद्र चोरडिया याने फिर्यादीला फोन करून तू माझी बदनामी करते जर बदनामी केली तर तुझा खून करेल जे शरीर सुख मला तिच्याकडून भेटले नाही तर तुझ्याकडून करून घेईन असे १४ जुलै रोजी फोन करून बोलत अपमान करून जातिवाचक शिविगाळ करत तुम्ही माझे काही करु शकत नाही माझ्याकडे शस्त्र देखील असल्याचे सागितले मी गरिब असुन दोन लहान मुले आहे घरची जवाबदारी माझ्यावर आहे अपमान सहन झाल्याने व दोष नसताना त्रास होत असल्याने मी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला होता पण नातेवाईक व भावाने समजून सांगितल्यामुळे भाऊ आकाश जगताप छोटू बोरगे सचिन बोरगे यांच्याबरोबर सार्थक चोरडियाला व इतर बंधुना समजावून सांगितले असता त्याने जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने जबरी मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे माझे सार्थक चोरडिया स्वादेश चोरडिया जितेश चोरडिया कमलेश चोरडिया निलेश चोरडिया सर्व राहणार राहता यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार असून २७ वर्षीय महिलेने राहता पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दाखल केल्याने राहता पोलिसांनी घटनेचे गाभिर्य ओळखुन तात्काळ गंभीर दखल घेत या पाचही आरोपींच्या विरुद्ध भादवी १८९(२), १९१(२) १९०,११५(२) ३५२,अनुसुचित जाती जमाती अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस करीत आहे ह्या घटनेची माहिती मिळताच मातंग समाजाचे नेते तथा शिर्डी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुरेश आरने यांनी सांगितले कि असे प्रकार एका व्यापाऱ्याकडून होणे हे खूप निंदनीय आहे पोलीस प्रशासनाने ह्याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी कारवाईत दुजाभाव करू नये