सावळीविहिरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सावळीविहिर बु. येथील आंबेडकर स्मारकामध्ये सावळीविहीर गावातील भीम अनुयायी. बौद्धाचार्य. तसेच सावळीविहीर ग्रामपंचायत चे सरपंच. ग्रामस्थ. सदस्य . सामाजिक कार्यकर्ते .उपासक उपासिका
उपस्थिती, शालेय विद्यार्थी.
महिला मंडळी. यांच्या हस्ते विधिवत पूजन करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. .त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांमध्ये जाऊनही महाराजांना पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सावळीविही चे सरपंच ओमेश जपे म्हणाले की संघर्षमय जीवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले. समाजासाठी आपल्या प्रपंचाची राख रांगोळी त्यांनी करून तमाम जनतेला गुलामीतून मुक्त करून शिका. संघटित व्हा व संघर्ष करा.
असा मोलाचा संदेश त्यांनी दिला आज त्यांच्या घटनेवर संपूर्ण देश चालतो असे ते म्हणाले
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्येचे पुस्तक आहे या पुस्तकाचे पाने कधीही संपणारे नाही. ज्या पुस्तकाने मनुष्य जातीचा उद्धार झालेले आहे. या पुस्तकामुळे प्रगतीशिल जीवन मनुष्य जगायला लागलेला आहे.
प्रत्येक नागरिकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालेली आहे ही बाबासाहेब आंबेडकरांची मोठी देणगी आहे राज्यघटने ने. सर्व जनतेला समान न्याय व हक्क दिलेले आहे. या घटनेचा अभ्यास करण्यासाठी परदेशातील लोक आपल्या भारतात येत असतात .याप्रसंगी सावळीविहीर ग्रामस्थांच्या वतीने महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी उपसरपंच विकास जपे, सोपानराव पवार. पत्रकार राजेंद्र दुनबळे.गणेश
आगलावे,गणेश कापसे,सुनील आगलावे,पो.पाटील संगीता वाघमारे,सुरेश वाघमारे,हरिभाऊ पवार,गंगाधर पवार, बौद्धचार्य गौतम गोडगे,बाबासाहेब पगारे,विनायक वाघमारे,
सचिन(पप्पू) वाघमारे,शिवनाथ पवार,गोकुळ पवार,मंगेश साळवे,रवी वाघमारे,सुनील गायकवाड, मनोज वाघमारे,मुकेश वाघमारे,पंकज वाघमारे,सतीश वाघमारे,श्याम वाघमारे, हिराबाई जाधव,जयश्री गाडगे.नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते