महिलांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेणारे शिंदे पहिले मुख्यमंत्री कमलाकर कोते
शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्रातील महिलांच्या साठी थेट . महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ ची घोषणा आणि त्यातच महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजनांसाठी करण्यात आलेली तरतूद हे महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रमाण दिले असून महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिलांसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची” घोषणा करून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा दिड हजार रुपये लाभ दिला जाणार असून केवळ घोषणा न करता तात्काळ अमलबजावणी साठी प्रयत्न करणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहे असे मत शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी व्यक्त केले आहे
कोते म्हणाले की , या योजनेद्वारे सुमारे २ कोटी पेक्षा जास्त महिलांना थेट लाभ देण्याचे ध्येय राज्य सरकारचे आहे, हा निर्णय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, लेक लाडकी योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांसाठी पिंक रिक्षा, व्यावसायिक शिक्षणासाठी मुलींना फी माफी, २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उदिष्ट अशा अनेक योजना व कल्याणकारी निर्णयांद्वारे श्री. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून खऱ्या अर्थाने महिलांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे काम कायम लक्षात राहणारे आहे असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी व्यक्त केले आहे