शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी शहरातील मध्यवर्ती अशा गर्दीच्या ठिकाणी नगर मनमाड रोड लगत नगर परिषदेच्या शेजारील असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून एक जण आज शुक्रवारी सायंकाळी पडून जागीच मयत झाला आहे. या इसमाने पाण्याच्या टाकीवरून
उडी घेऊन आत्महत्या केली, की त्याला कोणी ढकलून दिले. हे अद्याप समजू शकले नसले तरी त्याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारल्याचे काही प्रत्यक्ष दर्शनी सांगतात.
मात्र या घटनेमुळे शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे नेहमी गजबजलेले वातावरण असते. त्यात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने शिर्डीत गर्दी आ
त्यात शिर्डी शहराच्या नगर मनमाड लगत असणाऱ्या नगरपरिषदेच्या कार्यालया शेजारी मध्यवर्ती व गजबजलेल्या अशा ठिकाणी असणाऱ्या जागी पाण्याची टाकी आहे. येथे अनेक मोलमजुरी करणारे तसेच गांजा दारू अशी नशा करणारी ही नेहमी रेंगाळलेले असतात. अशा या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाकी वरून एक जण पडून मयत झाला आहे.
त्याने उडी मारली की त्याला कोणी ढकलून दिले हे गुलदस्त्यात आहे. मात्र. सुमारे 50 ते 60 फुटावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे, त्याने उडी मारून आत्महत्या केली की त्याला कोणी ढकलून दिले हे अद्याप समजू शकले नसले तरी उलट सुलट चर्चा शिर्डीत आता ऐकू येत आहे. पोलीस, अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र सदर इसम जागीच ठार झाला आहे.
यामुळे शिर्डीत उलट सुलट चर्चा होत असून शिर्डी नगरपरिषदेची ही पिण्याची पाण्याची टाकी छत्रपती कॉम्प्लेक्स समोरच आहे. तेथे नेहमी गर्दी असते. मात्र या टाकीवर हा ईसम चढला कसा? या पाण्याच्या टाकीला पायऱ्या आहेत, मात्र या पायऱ्या मोकळ्या आहेत का? त्यांना दरवाजा आहे की नाही? हा मोठा प्रश्न आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या या पाण्याच्या टाकीला संरक्षण ,सुरक्षितता गरजेचे आहे.
मात्र तशी परिस्थिती या प्रकारामुळे नसल्याचे उघड झाले आहे. कारण पायऱ्या चढून हा इसम वर गेला कसा? हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान टाकीवरून पडून मयत झालेला सुनील विश्वनाथ सूर्यवंशी वय 32 राहणार बेळगाव इसम कोण आहे त्याची अद्याप माहिती समजू शकली नाही. मात्र या प्रकाराचा शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.