शिर्डी ( प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तेरा फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डी परिक्रमा होणार आहे. या शिर्डी परिक्रमा तारखेची घोषणा शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी करण्यात येणार आहे.
यासंदर्भात ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,सर्व शिर्डी ग्रामस्थ तसेच देश विदेशातील साईभक्त यांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की,
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिर्डी महापरिक्रमा येत्या 13 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, तरी या तारखेची अधिकृतपणे जाहीर घोषणा शनिवार दि. 04/01/25 रोजी होणार आहे. तसेच कै. दिनू मामा कोते यांच्या शेतामध्ये महापरिक्रमेचे सुंदर असे घोषवाक्य गव्हाच्या पिकांमध्ये तयार केले असून त्याचे उद्घाटन तसेच 13 फेब्रुवारी च्या परिक्रमेचा प्रचार प्रसार आणि नियोजन सुरू करण्याचा कार्यक्रम सुजय विखे, ह. भ. प. महंत काशीकानंद महाराज,
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर , पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शिरीष वमने , शिर्डी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश दिघे , शिर्डीतील सर्व मान्यवरांच्या तसेच साई भक्तांच्या उपस्थितीत होत आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास
शनिवार दि. – 04/01/25 रोजी सायंकाळी ठिक 4:00 वा.
हॉटेल वत्सलाच्या मागे नवीन रिंग रोड,शिरडी येथे उपस्थित रहावे , त्याचप्रमाणे शिर्डी परिक्रमेतही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन या पत्रकातून ग्रीन एन क्लीन शिरडी, शिर्डी ग्रामस्थ ,साईभक्त यांच्यावतीने करण्यात आले आहे.