श्री रामनवमी उत्सवात तीन दिवस शिर्डी पोलिस प्रशासनाचा खडा पहारा
शिर्डी प्रतिनिधी/ साईभक्तांची रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर प्रचंड गर्दी होत असते. गर्दीचा फायदा घेऊन राज्यातील तसेच परराज्यातील चोर, खिसेकापू, सोनसाखळी चोर हे मोठ्या प्रमाणात भक्तांच्या चिज वस्तू चोऱ्या करत असतात मात्र यावेळी अशा घटना घडु नये म्हणून डि वाय एस पी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ६पथकाची स्थापना करण्यात आली होती.
चारचाकी दुचाकी साध्या वेशातील व गोपनीय व साईबाबा संस्थान सुरक्षा व्यवस्था शिर्डी पोलीस संयुक्त मोहीम राबविण्यात आली त्यामुळे या तीन दिवस. कालावधीत कुठल्याही अनुचित गुन्हेगारी घटना घडली नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली
कुंभार म्हणाले की शिर्डी पोलिसांनी शिर्डीत धुमस्टाईल चोरी रोखण्यासाठी प्राधान्य दिले असून साईतिर्थ मालपाणी उद्योग समुहाच्या माध्यमातून विविध भाषेत साईभक्त भाविकांना सोने चिज वस्तू सांभाळा असे आवाहन ३०फलक विविध ठिकाणी दिसतील असे लावण्यात आले त्याचे चांगले परिणाम पुढे आले आहे
त्या बरोबरच रामनवमी उत्सव काळात शिर्डी पोलीस साईबाबा संस्थान सुरक्षा यंत्रणा यांची मदत घेऊन संयुक्त पणे. तीन दिवस मोठ्या प्रमाणावर दक्षता घेण्यात आली काही संशयास्पद असलेल्या संशयित लोकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती साई मंदिर परिसरात साध्या वेशातील पोलिस व महिला पोलिस देखील तैनात करण्यात आले. त्यामुळे त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहे
यासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर काळे ज्ञानेश्वर कांयदे पप्पू कादरी साई मंदिर सुरक्षाचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी पीआरओ सपोनि श्री महेश येसेकर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक इंगळे व बाबासाहेब खेडकर पोलीस कर्मचारी यांनी यासाठी प्रयत्न केले