Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
क्राईमशिर्डी

दिवाळी सण व सुट्ट्यांमुळे होणाऱ्या गर्दी काळात नागरिकांनी ,महिलांनी सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेण्याचे शिर्डी पोलीस स्टेशनचे आवाहन!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी व पोलीस स्टेशनं हद्दीमध्ये दिवाळी सण उत्सव, सुट्ट्यांमुळे शहरात साई भक्तांची होणाऱ्या गर्दी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीला वचक बसावा. यासाठी शिर्डी पोलिसांनीही कंबर कसली असून नागरिकांनीही त्यासाठी दक्षता घ्यावी .असे आवाहनही करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दिवाळी सण व दिवाळीच्या सुट्ट्या यामुळे शिर्डी तसेच परिसरातील गावांमध्येही, मार्केटमध्ये गर्दी असते. एसटी रेल्वेना प्रवाशांची गर्दी असते. शिर्डीतही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भावी येत असतात. याचा भामटे फायदा घेत असतात. त्यामुळेच चैन स्नॅचिंग (सोनसाखळी चोरी) मोटर सायकल चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी, फसवणूक तसेच आक्षेपार्ह मजकूराचा वापर सोशल मीडियावर करणे, नको त्या अफवा पसरविणे, अशा गुन्हयांना प्रतिबंध व्हावा.

तसेच जनतेने सतर्क व जागरुक व्हावे. या करीता शिर्डी पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे की, या दिवाळीच्या काळात नागरिकांनी दक्षता घ्यावी, घरामध्ये मोजकीच रोख रक्कम ठेवावी. सोने-चांदीचे दागिने सुरक्षिततेसाठी बँक लॉकरचा वापर करावा.बाहेरगावी जाताना आपले घराचे खिडक्या दरवाजे व्यवस्थित बंद करावेत. आपण बाहेरगावी जात असल्याबाबत आपले शेजारी यांना माहिती द्यावी.

महिलांनी दिवाळी सण उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेत वावरतांना आपल्या मौल्यवान वस्तू (दाग दागिने, पर्स,मोबाईल) कशा सुरक्षित राहतील यावर भर दयावा, महिलांनी बाजारात व इतर ठिकाणी घराबाहेर जातांना त्यांनी परीधान केलेले दागिने हे व्यवस्थीत झाकलेले असावेत. शक्यतो मॉर्निंग वॉकला जातांना दागिने परिधान करु नयेत तसेच एकटे जाणे टाळावे.


कोणत्याही अनोळखी इसमांसोबत बोलतांना आपल्या दागिन्यांची व पर्सची, मोबाईल फोनची काळजी घ्यावी.अनोळखी इसम पत्ता विचारण्याचे बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याचे पासुन सुरक्षीत अंतर ठेवावे अथवा त्याचे सोबत बोलणे टाळावे.


काही अनोळखी इसम आपले जवळ येवुन कपडयांवर घाण पडली किंवा पत्ता विचारण्याचे बहाणा सांगुन आपले लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करुन आपले जवळील रक्कम किंवा दागिन्यांची बॅग, मोबाईल पळवून नेण्याची शक्यता असते तरी आपण या बाबीची दक्षता घ्यावी.


आपली रकमेची बॅग, मोबाईल, फोन व्यवस्थीत सांभाळुन ठेवावे. आपले घरी आम्ही विशिष्ठ कंपनीचे लोक आहोत, सर्वे सुरु आहे किंवा, दागिने चमकवुन देतो असे म्हणणाऱ्या ईसमांना प्रवेश देवु नये. असे इसम हे फसवे असतात .ते दागिने चमकवुन देण्याचे बहाण्याने आपले दागिने पसार करतात. असे इसम आढळुन आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.
आपणांस शक्य असल्यास आपले राहते घर, दुकान परीसरात सीसीटीव्ही कॅमेरेंची जोडणी करुन घ्यावी.

शक्य असल्यास सोसायटी फ्लॅट या ठिकाणी रात्रीचे वेळी सुरक्षा रक्षकाची नेमणुक करावी आणि सदर सुरक्षा रक्षकाचे फोटो व आधारकार्ड संबंधीत पोलीस स्टेशन येथे सादर करावे. आपले परीसरात कोणतीही संशयीत व्यक्ती, वस्तु, वाहन, घटना इ. आढळुन आल्यास त्या बाबतची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी.


कोणतेही व्यक्ती लसीकरण, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, पंतप्रधान आवास योजना अथवा कंपनी प्रतिनीधी बाबत सर्व्हे करीत असतील तर त्यांचे व्हेरीफिकेशन करावे तसेच कोणालाही घरात प्रवेश देवु नये. शंका असल्यास पोलीसांना माहिती दयावी.


आपले परीसरात नविन फेरीवाले आल्यास त्यांना त्यांचे ओळखपत्र विचारावे .त्यांचेकडे ओळखपत्र नसल्यास व संशयित वाटत असल्यास तात्काळ पोलीसांना माहिती देवुन त्यांचा फोटो आपले मोबाईल फोन मध्ये काढुन घ्यावा.

मोटर सायकल पार्किंग करताना सुरक्षित ठिकाणी तसेच लॉक करून पार्किंग करावी. बस, रेल्वे, मध्ये चढताना उतरताना तसेच गर्दीच्या ठिकाणी, मार्केटमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू, रकमेची, पाकिटाची अधिक दक्षता, काळजी घ्यावी.
वरील सुचनांचे जनतेने पालन करुन आपले व आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे. असे शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने हद्दीतील नागरिकांना, महिलांना आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button