शिर्डी ( प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील शिर्डी येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड यांचे गुरुवार दि.19 डिसेंबर २०२४ रोजी सकाळी 6 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या 77 वर्षाच्या होत्या.संवत्यर (रामवाडी)ता कोपरगाव येथील स्म्शानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या मागे
शांताराम निवृत्ती गायकवाड
गंगाधर निवृत्ती गायकवाड
बापूसाहेब निवृत्ती गायकवाड हे चार मुले व
सचिन शांताराम गायकवाड
आकाश चंद्रकांत गायकवाड
शुभम गंगाधर गायकवाड
अजय चंद्रकांत गायकवाड
अभिषेक बापूसाहेब गायकवाड हे नातू तसेच मोठा परिवार आहे.
कै.श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन एक यशस्वी गृहिणी म्हणून नांवलौकीक मिळविला.मनमिळावू व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते.त्यांच्यामागे यांच्या निधनामुळे शिर्डी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांना सर्वत्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.