प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा अकस्मात मृत्यू झाला. पुण्यातील चाकण भागात एका कार्यक्रमात गरबा खेळतानाच माळींनी एक्झिट घेतली.
गोलाकार गरबा खेळत असतानाच अचानक अशोक माळी कोसळले. माळींना गरबा खेळताना पाहण्याचा आनंद घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही मोठा धक्का बसला. हृदयविकाराचा धक्का आल्याने अशोक माळी यांचं निधन झाल्याची माहिती आहे. ही दुर्दैवी घटना कॅमेरात कैद झाली.
चाकण येथील गरबा-दांडिया कार्यक्रमात नेहमीप्रमाणे ते आपला अनोखा अंदाज सादर करत होते. दांडियाच्या तालावर लयबद्ध अदाकारी करत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. मात्र अचानक त्यांच्या हृदयात तीव्र वेदना जाणवू लागली. नाचता नाचता जागेवरच कोसळून ते काही क्षणांतच बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.