शिर्डीत साईभक्त भाविकांना चांदीच्या ताटात जेवनउद्योजक दिपक निकम यांचा उपक्रम
कोविडच्या प्रकोपात साईसंस्थानच्या रूग्णालयातील डाॅक्टर व कर्मचा-यांसाठी दिल्ली येथील साईभक्तांकडून युध्दपातळीवर खास विमानाने देणगी स्वरूपात पीपीई किट उपलब्ध करून देण्यासाठी येथील निस्सिम साईभक्त तथा उद्योजक दीपक निकम यांनी पुढाकार घेतला. आता ते चालवीत असलेल्या अॅबीगेल रिजन्सी या हाॅटेलात त्यांनी साईभक्तांना चांदिच्या ताटात भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. चांदिचे ताट, चांदिच्या सात वाट्या आणि चांदिचाच ग्लास असा थाट असलेल्या या शाही भोजनासाठी कुठलेही अतिरीक्त शुल्क आकारण्यात आलेले नाही. भाविकांची शिर्डी भेट संस्मरणीय व्हावी याहेतूने साईभक्तीच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले
कोविड प्रकोपात साईसंस्थानने सूरू केलेल्या रूग्णालयात राज्यभरातून रूग्णांचा ओघ सुरू झाला. पीपीई किट आणि अन्य वैद्यकीय साहित्य मिळवीणे मुश्कील झाले. अशा कठीण काळात निकम व त्यांचे सहकारी यांनी दिल्लीतील साईभक्तां सोबत संपर्क साधला. अवघ्या दोन दिवसात त्यांनी हे साहित्य खास विमानाने शिर्डीला धाडले. केवळ साईसंस्थानच्या रूग्णालयाचीच नव्हे तर तालुक्यातील सरकारी कोविड रूग्णालयाची गरज देखील या साहित्यामुळे पूर्ण झाली.
येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात एकशे चाळीसहून अधिक वृध्द वास्तव्यास आहेत. या आश्रमास वाढीव इमारतीची गरज होती. निकम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. दाते शोधून नवी इमारत उभी करून दिली. साईभक्तीच्या प्रेरणेतून त्यांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात ते सदैव आघाडीवर असतात. साईभक्तांना चांदिच्या ताटात भोजन देण्याचा उपक्रमाबाबत दीपक निकम यांनी सांगितले ते म्हणाले, भाविकांना चांदिच्या ताटात भोजन केल्याचा आनंद आणि समाधान वाटते. त्यांना त्यांची शिर्डी भेट आठवणीत रहावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे.
देश विदेशातील साईभक्त येथे येतात. त्यांच्यादृष्टीने स्वच्छता आणि सौजन्यपूर्ण वागणुक या दोन्ही बाबी फार महत्वाच्या असतात. येथे आल्यानंतर त्यांना कसा अनुभव येतो यावर बरेच काही अवलंबून असते. चांदिच्या ताटात भोजन या उपक्रमा बाबत साईभक्तांच्या प्रतिक्रीया अतिशय उत्साहवर्धक आहेत. दीपक निकम चालवत असलेल्या हॉटेल मधील संपूर्ण स्टाफ साईभक्त् आल्यानंतर भक्तान सोबत सौजन्याने वागत् त्यांचे स्वागत केले जाते
आणी रिसेप्शन जवळ एक मोठी एल ई डी लावून साईभक्तांना दर्शन व्हावे चारही आरत्या व्हाव्यात अशी ऑनलाईन सुविधा केलेली आहे साईभक्त ह्या हॉटेल मध्ये आल्यानंतर अतिशय् भक्तिमय वातावरणाचा अनुभव करीत असतात उद्योजक दीपक निकम हे कायम साईभक्तांच्या हितासाठी सदैव तत्पर असतात त्यातच ते धन्यता मानतात भक्तांची सेवा हीच साईंची सेवा मानतात