शिर्डी ( प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्ष शिर्डी शहराच्या “सरचिटणीस” पदी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमराज भीमसेन कावळे यांची निवड करण्यात आली आहे .
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सचिन निवृत्ती शिंदे पा.यांनी तसे पत्र दिले आहे.
या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त साईबाबा संस्थान सचिन तांबे, शहरउपाध्यक्ष शिंदे,पंडित गुडे,रवी सोनवणे,अमोल बडे,रवी जायभये,किरण बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांनी सोमराज भीमसेन कावळे यांचा निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून सत्कार करण्यात केला.
यावेळी सम्राट भीमसेन कावळे यांनी भाजपा पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी ती प्रामाणिकपणे आपण सांभाळू व पक्ष कार्यवाहीसाठी मोठा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.