विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत भाजप नेते वसंत देशमुख यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील महिला वर्गात संतापाची भावना निर्माण झाली असतानाच आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलांवरच गुन्हे दाखल करण्याची किमया संगमनेर पोलिसांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.आपल्या ट्विटमध्ये रूपवते यांनी म्हटले आहे की, समस्त समाजाला लाजवणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध सभेसाठी उपस्थित राहिलेल्यांवर आम्हा सर्वांवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केलाय !
त्याच सभेला नगर जिल्ह्याचे S.P. साहेब मा. राकेश ओला यांनी संबोधित केले… त्यांचं नाव कुठे दिसल नाही FIR मध्ये असा प्रश्न उत्कर्षां रुपवतेंनी उपस्थित केला आहे