राज्यस्तरीय वृक्ष संवर्धक पुरस्कार २०२४पुरस्कारासाठी फोटो पाठविण्याचे आवाहन
राहाता/प्रतिनिधी:
हल्लीच्या काळाती उन्हळ्याची वाढती तिव्रता आणी पावसाचे अत्यल्प प्रमाण यावर आजच विचार होणे खुपच आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात विचार करण्यासाठी देखील वेळ मिळू शकणार नाही अशी भयानक अवस्था असु शकेल, करीता प्रत्येकाने वृक्ष लागवड करत वृक्ष संवर्धन चळवळ निर्माण करणे ही काळाची गरज बनली असल्याचे ओळखून
समता फाऊंडेशन, स्वाभिमानी संपादक सेवा संघ व स्वाभिमानी प्रसार माध्यम समुह यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात येत. आहे.
स्वाभिमानी प्रसार माध्यम समुहाच्यावतीने समता फाऊंडेशन आणी स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, दैनिक विदर्भ सत्यजित/ सांयदैनिक साईसंध्या/दैनिक समतादूत दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज/ दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल तथा स्वाभिमानी न्यूज नेटवर्क आणी समता न्यूज सर्व्हिसेसचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार मा.शौकतभाई शेख यांच्या ३० ऑगस्ट २०२४ रोजी साजरा होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वृक्ष संवर्धक पुरस्कार २०२४ चे वितरण करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा स्वाभिमानी प्रसार माध्यम समुह संपादक उद्धव श्रीराम फंगाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
करीता जास्तीत जास्त वृक्ष, पर्यावरण,जल प्रेमी बंधू – भगीनींनी यात आपला सहभाग नोंदवून वृक्ष संवर्धन ही मोठी चळवळ निर्माण करावी असे अवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच यावर्षी ज्यांनी ज्यांनी वृक्ष लागवडी मध्ये सहभाग घेवून वृक्ष लागवड केली आहे, तथा जे आजपासून ते दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत यात सहभाग नोंदविणार आहेत, त्यांनी आपले वृक्ष लागवड करतानाचे फोटो/ ठिकाण/ (फोटो कॅप्शन) असे स्पष्ट अक्षरात श्री.अजिजभाई शेख राहाता यांच्या 77096 08304 या व्हॅटसअप क्रमांकावर दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावी,या मोहिमेत सहभागी होणाऱ्या वृक्ष संवर्धकांच्या योग्य कार्याची निवड करुन प्रथम ,दृतीय, तृतीय असे ३ राज्यस्तरीय वृक्ष संवर्धक पुरस्कार (शाल/ श्रीफळ/ पुष्पगुच्छ/ सन्मान चिन्ह/ सन्मानपत्र) देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे.
तसेच इतर सर्व सहभागी मान्यवरांना वृक्ष संवर्धक सन्मानपत्र देण्यात येणार आहे,सोबतच सर्व सहभागी मान्यवरांचे वृक्ष लागवड करतानाचे फोटो त्यांच्या नावासह दैनिक समतादूत या ई- पेपर विशेषाकांतून राज्यभर प्रसिद्ध केली जाणार आहेत.
करीता या मोहिमेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांनी प्रथमतः वृक्षरोपन करतानाचे आपले फोटो यासोबतच आपले नाव/ गांव/ पासपोर्ट साईज १ फोटो, मोबाईल क्रमांकासह संपूर्ण पत्ता वरील दिलेल्या व्हॅटसअप क्रमांकावर पाठवावेत असेही शेवटी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.