नगरच्या वंजार गल्ली भागात दोन गटांत दगडफेक झाली. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि संपर्कप्रमुख सचिन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते तसेच वर्चस्व ग्रूपचे अध्यक्ष सागर मुर्तडकर यांच्यातील जुन्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.
यामध्ये दोघांच्याही कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. मारहाणीत जाधव जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी रुग्णालयात धाव घेत जाधव यांची भेट घेतली.
घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘या घटनेतील दोघेही माझ्या विरोधातील पक्षाचे आहेत. मात्र, अशावेळी राजकारणा आणता काम नये, याच उद्देशाने मी येथे आलो आहे.
विरोधकांकडून आमच्यावर दहशतीचा आरोप केला. मात्र, नगर शहरात अशी परिस्थिती आहे. हे प्रकार थांबले पाहिजे. नगरसेवकावर भरदिवसा हल्ला होत असेल तर ते शहराच्या दृष्टीने चुकीचे आहे,’ असेही लंके म्हणाले.