चक्क वकिलांना उचलून नेत केली हत्या.. राहाता शिर्डीसह राज्यात तीव्र प्रतिसाद,जिल्ह्यात पुन्हा कृष्ण प्रकाश सारखे खमके अधिकारी नेमण्याची गरज..!
शिर्डी प्रतिनिधी. अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच अशी घटना घडली की संपूर्ण राज्याला ह्या घटनेने हादरा बसला आहे ती घटना म्हणजे
राहुरी येथील ऍडवोकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी ऍडवोकेट मनीषा आढाव ह्या जोडप्याचा अमानुषपणे छळ करून त्यांचा खुंन करण्यात आला आहे त्याचा तीव्र निषेध राज्यातील वकील बांधव करीत आहे ह्यावरून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे कि अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रात आहे की बिहार मध्ये या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील वकिलांनी दिनांक 29 /1 /2024 रोजी न्यायालयाचे काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे राज्यातील अनेक न्यायालयात आजही काम बंद करून निषेध नोंदविला जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे कामकाजावर 3 फेब्रुवारी 24 पर्यंत न्यायालयीन कामकाज न करण्याचा ठरावही वकील संघा तर्फे करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील वकिलांच्या वतीने खालील विषयासाठी आंदोलन चालू केलेला आहे त्यात वकिलांची प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत ते पुढीलप्रमाणे
1) या संपूर्ण केसचा तपास एस आय टी या तपास यंत्रणे कडुन व्हावा.
2) विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी.
3) एडवोकेट प्रोटेक्शन अक्ट मंजूर व्हावा,,
4) अहमदनगर येथे त्वरित फास्टट्रॅक कोर्टाची नेमणूक करण्यात यावी.या विषयाचे निवेदन अहमदनगर उत्तर विभागाच्या वतीने बुधवार दिनांक 31जानेवारी 2024 ,रोजी दुपारी बारा वाजता शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे वरील विषयाचे मागण्यांचे निवेदन दिले आहे त्यानंतर एक दिवशीय धरणे आंदोलन राहता न्यायालय परिसरात करण्यात येत आहे ह्या जिल्ह्यात जर वकिलांसारखे लोक सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य व्यक्ती कसे सुरक्षित राहतील हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यात बदलून आलेले पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडून नगर जिल्हयातील नागरिकांना खूप अपेक्षा होती की ह्या जिल्ह्यात होणारे अत्याचार, गुन्हेगारी व अवैध्य व्यवसायांना आळा घालतील परंतु तसे अनेक घटनांवरून होतांना दिसत नाही संपूर्ण जिल्ह्यात राजरोसपणे सर्व प्रकारचे अवैध्य व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत काही पोलिस अधिकारी आपले कर्तव्य चोखपणे बजावतांना दिसत आहेत परंतु काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करतांना दिसत आहेत ह्यावरून अश्या घटणा घडत असल्याचे नागरिक बोलत असल्याचे चित्र आहे हा तोच अहमदनगर जिल्हा आहे जेथे कृष्ण प्रकाश सारखे पोलीस अधीक्षक लाभले होते
त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात वेगळीच छाप टाकली होती जे जे कायद्याच्या अंमलबजावणी करीत नव्हते आणि त्यांच्या मागे राज्यातील सरकार उभी होती तरीही त्यांनी कुठलीही पर्वा न करता जे कायद्यात आहे ते करीत असताना जे राजकीय पक्षांच्या जीवावर उड्या मारणारी नेते मंडळीं होतें जे कायद्याला मानीत नव्हते त्यांना जेल मध्ये घातले म्हणून आजही जिल्हयातील नागरिक कृष्ण प्रकाश यांचे नाव घेतले जाते तश्याच प्रकारचे अधिकारी जिल्ह्यात पुन्हा यावेत अशी चर्चा नागरिकात आहे
आज एका नामांकित वकिलाचा कोर्टातून उचलून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे म्हणून आज संपूर्ण जिल्हा दहशती मध्ये आहे खुनाच्या निषेध करण्यासाठी आणि वकील संरक्षण कायदा त्वरित पारित करून अमलात आणण्याकरिता शुक्रवार दिनांक 2/2/2024 रोजी आजाद मैदान, मुंबई येथे आंदोलन होणार आहे.
सकाळी 10:00 ते 3:00 वाजेपर्यंत आजाद मैदान येथे आंदोलन होईल. दुपारी 3:00 वाजेनंतर आपल्या मागण्यांकरिता मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.आढाव खुनाची एस आय टी कडे वर्ग करा वकील संघाची मागणी
शिर्डी/ राहुरी येथील वकील राजाराम आढाव व त्यांची पत्नी वकील मनीषा आढाव या ह्या जोडप्याचा अमानुषपणे छळ करून त्यांचा खुन करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली त्याचा तीव्र निषेध राज्यातील वकील बांधव करीत आहे निषेध म्हणून राज्यातील वकिलांनी दिनांक २९ जानेवारी रोजी न्यायालयाचे काम बंद करून निषेध व्यक्त केला आहे नगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे कामकाजावर ३ फेब्रुवारी २४ पर्यंत न्यायालयीन कामकाज न करण्याचा ठरावही वकील संघाने तर्फे करण्यात आला आहे वकिलांचे वतीने प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत शिर्डी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी वकील संघाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अश्या घोषणा दिल्या