आहिल्यानगर : आहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांच्या जोरदार लढत झाली.
निलेश लंकेंनी 28 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेच्या 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली
त्यावर अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनीही प्रतिक्रिया दिली. सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा, अस टोला लंकेंनी लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या व्हीव्हीपॅट प्रकरणी निकालाचे पहिले लाभार्थी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे ठरले आहेत.
सुजय विखे यांनी आज व्हीव्हीपॅट पडताळणीचे 21 लाख रुपये भरले आहेत. विखे यांनी 21 लाख भरुन सर्वोच्च न्यायालयात शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, संबंधित याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी फेटाळली.