मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुप्रीम कोर्टाने दिला धक्का40आमदारांना नोटिस बजावली
नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवत ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यांच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि 39 आमदारांना नोटीस जारी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंना सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांचे म्हणणे सादर करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय त्यांची बाजू ऐकून घेईल. यासंदर्भातली पुढची सुनावणी 15 दिवसांनी होईल. याची निश्चित तारीख आत्ताच सांगता येणार नाही. विधानसभा अध्यक्षांच्या निकाला विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या अडचणी वाढणार की काय?नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिला, त्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याच ठाकरे गटाने म्हटलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाला नोटीस आली आहे.