तालुक्यात वाळु माफियांच्या दहशती मुळे सर्वसामान्य नागरिकांचे जिवन धोक्यात आले असुन तहसीलदार सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना झुंड शाहिच्या बळावर धमकावण्याचे प्रकार वाढले असुन तशीच एक घटना नुकतीच सुरेगाव येथे घडली आहे कोळपेवाडी येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ यांना ट्रँक्टर खाली चिरडुन मारण्याची धमकी सुरेगाव शासकीय वाळु डेपोतील मँनेजर आंनद कदम यांनी दिल्याने तालुक्यात कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याने सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे.
याबाबत हकिकत अशी कि कोळपेवाडी येथील पत्रकार रमेश भोंगळ आपल्या वेल्डिंग वर्कशॉप मध्ये काम करत असतांना सोमवारी सांयकाळी सुरेगाव शासकीय वाळु डेपोत मँनेजर चे काम बघणारे आंनद भागवत कदम हे आपल्या पत्नीला घेवून दुकानावर येवून म्हणाले कि तुला पावत्या चेक करण्याचा काय अधिकार असुन, तु लय मोठा पत्रकार लागुन गेला आहे का? अशा ऐकीरी शब्दाचा उल्लेख करत पुन्हा आमच्या वाटेला गेला तर ट्रक्टर खाली चिरडुन जिवे मारण्यासाठी धमकी दिली. सदर घटना तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना समजताच अनेकांनी तालुका पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांना निवेदन देत वरील आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करत भविष्यात कुठल्याही अनुचित घटकाने पत्रकारांना धमकी देण्याची मजल गाठु नये यासाठी कठोर कारवाई ची मागणी केली. यावेळी पत्रकाराच्या भावना तिव्र होत्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर ३२३,५०६ कलमान्वये अदखलपात्र गुंन्हा ची नोंद करण्यात आली आहे .
ग्रांमस्थाच्या प्रखर विरोधानंतरही जिल्हा गौण खणिज विभागाने सुरेगाव गोदावरी नदी पात्रातुन बोटी व हातपाटी मजुराच्या साह्याने नियम अटिस अधिन राहुन साडेचार हजार ब्रास वाळु उपसा करण्याचा व्हाईट स्टोन इंटरप्राईजेस मुंबई यांना १० जुलै २०२३ मध्ये परवाना देण्यात आला असुन महसूल प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे डेपो मध्ये नियम बाह्य डुप्लिकेट पावत्या द्वारे एकाची वाळु दुसर्यास, नदी पात्रात पोक्लेन जे. सि. बी टिप्पर, डंपर,ट्रँक्टर यासारखी वाहणे उतरून तिन फुटा पेक्षा जास्त खोलीवर उत्खनन करणे, गौण खणिज खरेदी दाराकडुन मनमानी पध्दतीने भाडे वसुल करणे, नाशिक जिल्ह्यात प्रतिबंध असतांना वाळु टाकणे,
रात्री च्या सुमारास कँमेरे बंद करुन वाहणे नदी पात्रात उतरून अवैधपणे वाळु उपसा करून चढ्या भावाने नागरिकांना विकणे,व्यवसायिक वाहनांचा वापर न करणे यावर व्रुत्तपत्रातुन भोंगळ यांनी बातम्या प्रसिद्ध करुन वेळोवेळी आवाज उठवला असल्याने पत्रकाराचे माणसिक खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने धमकावल्याचा प्रकार घडल्याचे पत्रकाराच्या विविध संघटनांचे म्हणणे आहे.
सुरेगाव शासकीय वाळु डेपोतुन ठेक्या पेक्षा जास्त वाळु चे उत्खनन झाल्याने वाळु चा सत्य परिस्थिती वर पंचनामा करण्याच्या तक्रारी ला कोपरगाव तहसील कार्यालयाने कोणाच्या आदेशाने लाल फितीत बांधुन ठेवले आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे .